वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पांडुरंगे सत्य केला

🙏 3. संत तुकाराम · ABH-080855 · अभंग क्र. ३२७२

3272.
पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धीभेद ॥१॥
जीवशिवा शेज रचली आनंदे । आउटाविए पदी आरोहण ॥२॥
निजी निजरूपी निजविला तुका । अनुहाते बाळका हल्लरु गाती ॥३॥

अर्थ :
जीव आणि शिव यामध्ये भेद आहे हाच संदेह व बुध्दीभेद पाडूरंगाने नाहीसा केला व खरोखरच त्याने मला अनुग्रह केला. जीव आणि शीव यामधील भेद नाहीसा करुन आनंदाची शेज रचली व साडेतीन मात्रेचा ओंकाराच्या मूळ स्वरुपाच्या ठिकाणी मला त्याने स्थिर केले. तुकाराम महाराज म्हणतात, आणि या पाडूरंगाने मला नीजस्वरुपाच्या ठिकाणी निजविले आहे व अनुहात ध्वनीचा नाद माझ्या करमणूकीसाठी तो गात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग