वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पेणावले ढोर मार खाय

🙏 3. संत तुकाराम · ABH-080761 · अभंग क्र. ३२८६

3286.
पेणावले ढोर मार खाय पाठी । बैसले ते नुठी तेथूनिया ॥१॥
तैसी माझ्या मना परी झाली देवा । धावे अहंभावा सांडवलो ॥धृपद॥
कडा घाली उडी मागिलांच्या भेणे । पडणे मरणे न कळेचि ॥२॥
तुका म्हणे झालो त्यापरी दुःखित । असे बोलावीत पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
जे जनावर उठवणीस आले आहे ते पाठीवर मार खाते पण बसल्या जागेवरुन उठत नाही. त्याप्रमाणेच देवा माझ्या मनाची अवस्था झाली आहे कितीही सद्विचार ऐकले तरी ते मनाला पटत नाहीत आता तू माझ्या मदतीसाठी देवा धाव मी सर्व अभिमान टाकून दिला आहे. आपले प्राण घेण्यासाठी जर आपल्या मागे कोणी धावले तर आपण पर्वताच्या कडेवरुन खाली उडी मारु पण उडी मारताना आपण पडू आपण मरु हे कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा अगदी त्याप्रमाणे मी दु:खित झालो आहे त्यामुळेच मी तुला बोलावित आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग