उत्तम पुरुषाचे उत्तम
3272.
उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण । जेथे भेद शून्य मावळला ॥१॥
भेदशुन्य जाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ॥२॥
जिकडे पाहे तिकडे उत्तम दरुशन । दया शांति पूर्ण क्षमा अंगी ॥३॥
एका जनार्दनी उत्तम हे पाप्ती । जेथे मावळती द्वैताद्वैत ॥४॥
