संकल्प विकल्प जाण ।
3305.
संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचे लक्षण ॥१॥
सुख दुःखे उभीं । मन वर्ते धर्माधर्मीं ॥२॥
स्वर्ग नरकक बंध मोक्ष । मन जाणतें प्रत्यक्ष ॥३॥
शुभ अशुभ कर्म । मनालागीं कळे वर्म ॥४॥
करा निःसंकल्प मन । म्हणे एका जनार्दनी ॥५॥