वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

जेथे सत्त्वाचें प्रा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087814 · अभंग क्र. ३२७३

3273.
जेथे सत्त्वाचें प्राधान्य । जेथे सात्विकाचे आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥
जेथे राजाचें प्राधान्य । त्याचे लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाही ॥२॥
जेथे प्राधान्य तामस । तो द्वेषी आणि कर्कस । ज्ञान सांगे अपरोक्ष । परी अंतईं कठीण ॥३॥
जेथे प्राधान्य तूर्या । तेथे सत्त्व शांति दया । विवेक वैराग्य करूनियां । सर्वासीं भजे ॥४॥
जो वस्तु झाला केवळ । त्याचे अंतर निर्मळ । भूतमात्रीं दयाळ । सर्वापरी भजत ॥५॥
जेथे रज तम वसती । तेथे द्वेष लोभ नांदती । त्याचे संगें ज्ञानज्योती । विझोनि जाये ॥६॥
एका जनार्दनी शरण । जेथे शुद्ध सत्वाचें प्राधन्य । तो वस्तुसी जाय । मिळोनि सहजीं सहज ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग