माकडा दिसती कंवटी ना
3306.
माकडा दिसती कंवटी नारळे । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥
एका रस एका तोंडी पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥धृपद॥
सुनियांसी क्षीर चारील्या ओकवी । भोक्ता तो पोसवी धणीवरी ॥२॥
तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील ते सार परीक्षक ॥३॥
अर्थ :
वानराला केवळ नारळाची वरची कवटी दिसते परंतू नारळाविषयी पूर्ण माहिती असणाराच ते नारळ फोडून खातो. पहा म्हणजे एकाच्या मुखामध्ये नारळाचा स्वाद पडतो तर एकाच्या मुखात माती पडते म्हणजे त्याला नारळच खायलाच मिळत नाही. सारांश असा की, जो तो आपल्या ज्ञानानुसार आपापला विभाग नेत असतो. कुत्र्याला जर खीर टाकली तर तो खीर खातो परंतू पुन्हा ओकून ती खीर बाहेर टाकतो परंतू तो खरोखर खीर खाऊन तृप्त होतो व त्या खीरीचा भोग घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक मूर्ख आहेत ते व्यर्थ भार वाहात असतात आणि जे खरे परीक्षक असतात ते मुख्य सारच घेऊन जातात.
