वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

किती सांगो तरी नाईकत

🙏 3. संत तुकाराम · ABH-080544 · अभंग क्र. ३२८९

3289.
किती सांगो तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥
नका नका करू रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥धृपद॥
तुका म्हणे जरी देवी नाही चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥२॥

अर्थ :
अहो या बटकीच्या लोकांना किती सांगावा तरी देखील ते ऐकत नाही पण हे शिंदळीचे पुढे रडतील. अहो तुम्ही इच्छारुपी रांडेची संगती करु नका ती तुम्हाला अधोगतीला तर नेईलच परंतू यमलोकाला नरक भोगण्यास घेऊन जाईन. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जर तुम्हाला देवाविषयी आवड नसेल तर काळ तुमचे थोबाड फोडून तुम्हाला मारेन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग