कारणा कारण वारीयेले
3291.
कारणा कारण वारीयेले जेथे । जातो तेणे पंथे संतसंगे ॥१॥
संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । पाडुरग भेटे भरंवसेनी ॥३॥
अर्थ :
कार्य आणि कारण ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत त्या मार्गाने मी जात आहे व इतरांनाही त्या मार्गाने मी बोलावीत आहे. संत देखील याच मार्गाने पुढे गेले आणि भवसमुद्र पार करुन ते पैलतीरावर पोहोचले व त्याची निशाणी म्हणून त्यांनी विजयाचा ध्वज फडकविला व ती निशाणी पाहूनच मी आनंदाने हरीनामाची गर्जना करत या मार्गाने चालत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे तुम्ही देखील याच मार्गाने माझ्या मागोमाग चाला तुम्हाला पाडूरंगाची भेट होईल हे निश्चिंत आहे असा भरवसा ठेवा.
