मनाचा सविस्तार । ऐका
3306.
मनाचा सविस्तार । ऐका तुम्ही वो निर्धार ॥१॥
मने केले सगुण निर्गुण । मने दाखविले चैतन्य ॥२॥
मने नागविले देवा । मने लोळविलें जीवां ॥३॥
मन अज्ञानाची राशी । मन धांवें ते सायासी ॥४॥
एका जनार्दनी मन । दृढ ठेवावें बांधोन ॥५॥
३३०७ .
मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयी तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥
धरी विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥
करी संतांचा सांगात । पूर्ण होती मनोरथ । न धरी दुजा हेत । विठ्ठलावांचुनीं ॥३॥
बहु सांडी तुं भाषण । आणिक न करी साधन । एका जनार्दनी शरण । विठ्ठलासी निघे पा ॥४॥
