वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तरिच शोभे वेडी । नग्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080776 · अभंग क्र. ३३००

3300.
तरिच शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥१॥
काय बोलाचे गौरव । आत वरी दोन भाव ॥धृपद॥
मृगजळा न्याहाळिता । ताहान न वजे सेविता ॥२॥
न पाहे आणिकाचीवास । शूर बोलिजे तयास ॥३॥
तुका म्हणे या लक्षणे । संत अळंकार लेणे ॥४॥

अर्थ :
जी स्त्री अंगावरील चांगले वस्त्र फाडून नग्न होते तीच स्त्री वेडी म्हणून शोभत असते. म्हणजेच मी परमार्थ करतो आणि याचे भांडवल करुन जगाला पटवून देतो या बोलण्याचा काय उपयोग आहे अंतरंगात एक भाव आणि बाह्यरंगात दुसराच भाव जर असेल तर तो मनुष्य जगाचे कल्याण तरी कसे करेल ? केवळ मृगजळाला न्याहाळून तहान जाईल कशी त्यासाठी पाणी प्यावे लागले तेव्हा आपली तहान जाईल त्याशिवाय जाणार नाही. युध्द प्रसंगी कोणाचीही वाट न पाहात जो लढाई करतो त्यालाच शूर म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या अंगी सत्कार्य करण्याचे, सत्विचार जगाला सांगण्याचे आणि अंतरंगात केवळ दुसऱ्याचे हित करण्याचे लक्षण आहे व सद्गुणाचे अलंकार ज्यांनी अंगावर परिधान केले आहेत त्यांनाच संत म्हणावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग