जैसी तैसी तरि वाणी ।
3284.
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥
लेकरांच्या स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ॥धृपद॥
मागे पुढे रिघे पोटी । साहे खेटी करी ते ॥२॥
तुका विनवी पांडुरंगा । ऐसे पैंगा आहे हे ॥३॥
अर्थ :
लहान मूल कसेही बोबडे बोल बोलले तरी त्याची आई ते बोल मान्य करुन घेते. लहान मुलाविषयी त्या आईचा स्नेह फार दृढ असतो ते लहान मूल कसेही बोल बोलले कसेही वर्तन त्या लहान मुलाने केले तरी त्याचे सर्व गुणाचे कौतुक करुन गोड मानून घेते. लहान मूल सारखे आईच्या मागे पुढे करत असते तिला त्रास देते तिला धक्के मारते तरी देखील ती माऊली त्याच्या सर्व त्रास खोडया सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा आई आणि मुलामध्ये असा स्नेह असतो त्यामुळे मी जो काही तुला त्रास देईल तो तू सहन कर अशी विनंती मी तुला करतो आहे.
