विश्वपाळिता हे हरी ।
3283.
विश्वपाळिता हे हरी । दासा केवी तो अव्हेरी ॥१॥
नव मास गर्भवास । नाही भागला आम्हांस ॥२॥
बाळपणी वांचविलें । स्तनीं दुग्ध ते निर्मिलें ॥३॥
कीटक पाषाणांत वसे । त्याचे मुखी चारा असे ॥४॥
धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनी त्याचा दास ॥५॥
