मने कल्पोनियां केली
3297.
मने कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥ तैसे नका करू वाउगे चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥ मनाचे आकलन करावे पा आधी । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥ एका जनार्दनी आवरुनी मन । मग करी भजन सुखरूप ॥४॥