शरणागत आलिया नुपेक्ष
3280.
शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥
सर्व भावे जावे नाम वाचे गावें । जिवलगा भेटावे विठोबासी ॥२॥
साधुसंत गाती आनंदें नाचती । क्षेम तयाप्रति द्यावे सुखें ॥३॥
एका जनार्दनी पाहता विठ्ठल । जन्ममरण निवारेल हेळामात्रें ॥४॥
