वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

फिरविले देऊळ जगामाजी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080687 · अभंग क्र. ३२७०

3270.
फिरविले देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हाती दुध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहत्याची । धनाजी चाटयाची सेते पेरी ॥धृपद॥
मिराबाईसाठी प्याला तो विषाचा । लाख्या कोलाटयाचा ढोल पिटी ॥२॥
कबीराचे मागी विणू लागे शेले । मूल उठविले कुंभाराचे ॥३॥
आता तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पाया वेळोवेळा ॥४॥

अर्थ :
तीर्थयात्रा करत असताना नामदेवराय औंढया नागनाथाला गेले तेथे देवळाच्या आवारामध्ये पश्चिमेकडे नामदेव महाराजांचे किर्तन होते परंतू किर्तन ऐकण्यासाठी देवाने देवळाचे तोंड फिरवून त्यांच्या सन्मुख देवळाचे तोंड केले आणि देव स्वत: नामदेवरायांच्या हातातील दूध पिले अशी नामदेवांची ख्याती जगामध्ये आहे. नरसिंह मिळत्याची हुंडी देवाने स्वत: भरली, धनाजी चाटयाने पेरणीसाठी जे बी आणले ते बी संत आले म्हणून त्यांच्या भोजनासाठी त्याने वापरले तर देवाने त्याची शेती पेरली. मिराबाईला विष देण्यात आले त्यावेळी देवाने ते स्वत: विष पिऊन टाकले आणि लाख्या नावाचा कोल्हाटी याच्या खेळामध्ये देव स्वत: ढोल वाजवित होता. कबीराच्या पाठीमागे देव शेले विणू लागत होता. गोरोबा काका भजनात तल्लीन असताना चिखल तुडवित होते त्यावेळी त्यांचे मूल त्यांच्या पायाखाली आले व ते मूल मेले ते मूल देखील देवाने जिवंत केले. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीराया तुम्ही आता माझ्यावरही अशी दया दाखवा अशी विनंती मी तुमच्या पायाजवळ वेळोवेळी करीत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग