वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

स्वप्नी तोहि कैसा न

🙏 3. संत तुकाराम · ABH-080547 · अभंग क्र. ३२७८

3278.
स्वप्नी तोहि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥
चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळी रेखिलीसे ॥धृपद॥
शंक चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती श्रवणी दोन्ही ॥२॥
तुका म्हणे स्वप्नी दावी आता पाय । पांडुरंगे माया कृपावंते ॥३॥

अर्थ :
देवा तुझे रुपे सुंदर सावळे घवघवीत आहे तरी देखील माझ्या स्वप्नातही तू दृष्टीस का पडत नाहीस ? देवा तू चतुर्भूज आहेस एक पदरी माळ तुझ्या गळयामध्ये आहे आणि कस्तुरीचा अतिशय रेखीव टिळा तुझ्या कपाळावर शोभून दिसत आहे. देवा तुझ्या हातामध्ये शंख चक्र पद्म गदा ही आयुधे आहेत गळयामध्ये वैजयंती माळ आहे. दोन्ही कानामध्ये कुंडले अतिशय चमकून दिसत आहेत असे तुझे सुंदर रुप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगे माझी आई कृपावंत माऊली तुझे पाय आता मला स्वप्नात तरी दाखव.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग