निवांत बैसे तू अचळ ।
3263.
निवांत बैसे तू अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांही तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥
सोडी मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामी तू धरी ॥२॥
नको समाधी उन्मनी । धांवूं नको सैरा रानीं । एका जनार्दनाचे चरणी । दृढभावें विनटे ॥३॥
