व्यापूनियां भरला देव
3281.
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठे पा ॥१॥
तयाचे करा रे चिंतन । मग तुम्हा न पडे न्यून ॥२॥
वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥
मागे पुढे उभा असे । एका जनार्दनी दिसे ॥४॥