सुखे संसारा हा करी ।
3262.
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥
दुःखरूप हा संसार । रामनामे सुख साचार ॥२॥
रामनामाचें स्मरण । नाश पावे जन्ममरण ॥३॥
जयापाशीं नाम असे । नारायण तेथे वसे ॥४॥
एका जनार्दनी नाम । संसार हा परब्रह्मा ॥५॥