सांडुनि सुखाचा वाटा
3299.
सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
का रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥धृपद॥
येथे मिळतो दही भात । नाही वैकुंठी ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांचिये संगे ॥३॥
अर्थ :
अहो या मनुष्य देहात भक्तीसुखाचा एवढा मोठा वाटा असून जो मुक्ती मागतो तो करंटाच आहे. मग भक्तीसुखासाठी जन्म का बरे घेऊ नये आणि वैकुंठाला जाऊन तरी काय करायचे आहे ? येथे दहीभाताचा काला खाण्यास मिळतो ज्याची अपेक्षा वैकुंठातील देव करतात आणि वैकुंठात तर काल्याची गोष्ट देखील होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला मुक्ती नको आहे मुक्तीची अपेक्षा देखील नाही मला मुक्ती लागतही नाही संतांच्या संगतीतच मी राहीन व हरीचे नाम घेईन.
