वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अनाथा जीवन । आम्हा त

🙏 3. संत तुकाराम · ABH-080438 · अभंग क्र. ३२८१

3281.
अनाथा जीवन । आम्हा तुमचे चरण । करुनी साठवण । ते धरिले हृदयी ॥१॥
पुष्ट झाली अंगकांती । आनंद न समाये चित्ती । कवतुके प्रीती । गाऊ नाचो उल्हासे ॥धृपद॥
करुणाउत्तरी । करू आळवण हरी । जाऊ नेंदू दुरी । प्रेमप्रीतीपडीभरे ॥२॥
मोहममता करी गोवा । एसे आहेजी केशवा । तुका म्हणे सेवा । आणिक नाही जाणत ॥३॥

अर्थ :
देवा आम्हा अनाथांसाठी तुमचे चरण म्हणजे जीवन आहे. म्हणूनच त्याची साठवण करुन आम्ही ते ह्दयात धारण केले आहे. माझी अंगकांती यामुळे अतिशय पुष्ट व दिव्य झाली आहे आनंद तर माझ्या चित्तामध्ये सामावतच नाही. आणि आता कौतुकाने व प्रेमाने तुमचे नाम गाऊ व त्या छंदात आनंदाने नाचू. आता करुण शब्दानी आम्ही हरीला आळवू. आणि प्रेमाने व आवडीने आम्ही तुला कोठेही दूर जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मोह आणि ममता हेच सर्वांना अडचण निर्माण करतात. देवा त्यामुळे मी केवळ तुमची सेवा करणे एवढेच जाणतो यावाचून दुसरे काहीही जाणत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग