मनास उपदेश - अभंग ३२
3295.
मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३
मन एके ठायी । राहे ऐसे करी कांही ॥१॥ सर्व साधनांचे सार । मनी करावा विचार ॥२॥
एकाग्र ते मन । करूनि करावे भजन ॥३॥ मन जिंकावें पा आधी । तेणे तुटेल उपाधी ॥४॥ एका जनार्दनी मन । दृढ ठेवावे बांधुन ॥५॥
