भुक्तिमुक्तीचा पांग
3282.
भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवी । जनी जनार्दन वागवी देह सर्व ॥१॥
भुक्ति आणि मुक्ति कासया ते वोझे । जनार्दने सहजें निर्दाळिलें ॥२॥
कल्पिक कल्पना आवरुनी ठायी । जनार्दन पाही सबराभरीत ॥३॥
त्याचियेनी सत्ते जाहलीसे मिळणी । एका जनार्दनी एकमय ॥४॥
