वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ऐसे कैसे झाले भोंदू

🙏 3. संत तुकाराम · ABH-080529 · अभंग क्र. ३२६८

3268.
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगा लावूनिया राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥धृपद॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहंळा ॥२॥
तुका म्हणे सांगो किती । जळो तयांची संगती ॥३॥

अर्थ :
अहो असे कसे भोंदू येथे झाले आहेत काय माहित कुकर्म करतात आणि स्वत:ला साधू म्हणतात. अंगाला राख लावतात डोळे झाकून ध्यानस्थ बसल्याचे सोंग करतात आणि रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे हे लोक पाप करत असतात. आपल्या अंगी खूप वैराग्य आले आहे असे लोकांना दाखवतात परंतू कोणालाही कळू न देता विषयसुखाचा सोहंळा हे भोगतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भोंदू लोकांच्या कुकर्माची गोष्ट तर मी किती सांगू असल्यांची संगतीही नको व त्यांच्या संगतीला आग लागो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग