वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

देवाचि भंडारी । आदा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080745 · अभंग क्र. ३२८५

3285.
देवाचि भंडारी । आदा विनियोग करी ॥१॥
आता न माखे हातपाय । नेणो होते कैसे काय ॥धृपद॥
देवे नेली चिंता । झाला सकळ करिता ॥२॥
तुका म्हणे धनी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥

अर्थ :
देवाचा कोशपतीच आमच्या जमाखर्चाची मांडणी करतो. आता आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला हातपाय मळावेच लागत नाही आणि हे कसे होते हे आम्हाला पण कळत नाही. देवाने आमची सर्व चिंताच नेली आहे आमचे सर्व कार्य करणारा देव झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा धनी श्रीपाडूरंग आहे त्यामुळे आमच्या सर्व आशा इच्छा अपेक्षा त्यालाच पूर्ण कराव्या लागतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग