होउनी उदास । मागा प्
3287.
होउनी उदास । मागा प्रेम सावकाश ॥१॥
उभा विटेवरी उदित । देता न पाहे चित्त वित्त ॥२॥
जे जे पाहिजे जयालागीं । ते ते देतो त्या प्रसंगी ॥३॥
न म्हणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥
एका जनार्दनी म्हणा दास । करा आस निर्भय ॥५॥
