निरंजनी आम्ही बांधिय
3271.
निरंजनी आम्ही बांधियेले घर । निराकारी निरंतर राहिलोंसे ॥१॥
निराभासी पूर्ण झालो समरस । खंड ऐक्यास पावलो आम्ही ॥२॥
तुका म्हणे आता नाही अहंकार । झालो तदाकार नित्य शुद्ध ॥३॥
अर्थ :
शुध्द ब्रम्ह स्थितीच्या ठिकाणी आम्ही घर बांधले आहे व तेथे आम्ही निराकार निरंतर अखंड रुपाने राहात आहोत. जेथे कोणत्याही प्रकारचा भास होत नाही अशा ब्रम्ह स्थितीत आम्ही समरस झालो आहोत व अखंड ऐक्यास आम्ही प्राप्त झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आता आमच्या स्वरुपामध्ये अहंकार हा राहिलेलाच नाही त्यामुळे आम्ही नित्य शुध्द झालो आहोत.
