वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पुराणिक म्हणविती । ज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080599 · अभंग क्र. ३२७७

3277.
पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥
अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥धृपद॥
श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥
बदराईच्या पाडी दाढा । लगे तुकयाचा हुंदडा ॥३॥

अर्थ :
काही लोक स्वत:ला पुराणिक म्हणतात, त्यांना सर्व काही माहिती असते तरी देखील ते कांदे खातात. अगस्तीचे मलमूत्र म्हणजे समुद्राचे मीठ ते कांदयाला लावतात आणि म्हणतात, की हे कृष्णावळ आहे व हे शुध्द आहे असे म्हणून खातात. ब्राम्हणाचा वर्ण म्हणजे श्रेष्ठ वर्ण आहे असे म्हणतात परंतू क्षुद्र स्त्रीचा संग काही सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे वाईट वागणाऱ्या लोकांना मी अतिशय कठोर शब्दात बोलून त्यांचे दातच पाडीत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग