वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

शोधूनि अन्वय वंश वंश

🙏 3. संत तुकाराम · ABH-080893 · अभंग क्र. ३२७५

3275.
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळी उच्चारण ॥१॥
म्हणविले मागे पुढे चाले कैसे । केला सामरस्ये अभिषेक ॥धृपद॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहात ध्वनी गगन गर्जे ॥२॥
तुकया स्वामी स्थापी निजपदी दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥

अर्थ :
देव हा भक्तांच्या वंशावळीतील कुळाचा शोध घेऊन त्याचा प्रथम उच्चार करतो. मग देव आपल्या म्हणण्यानुसार आपल्या मागेपुढे कसा चालतो तो पाहा. त्याप्रकारे त्यानेही माझी वंशावळ शोधून मला ब्रम्हरसाच्या रसाचा अभिषेक घातला व ब्रम्हरसाशी त्याने मला समरस केले. मग तेथे सर्व एक छत्राखालीच झळकत असते ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य झाल्यानंतर अनाहत ध्वनी गगन गर्जना करुन डंका वाजवू लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे मला दासाला माझ्या स्वामीने अतिशय उल्हासाने व प्रेमाने त्याच्या निजस्वरुपस्थितीत स्थापित केले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग