वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

हरिःॐ तत्सदिति सूत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-080575 · अभंग क्र. ३२८८

3288.
हरिःॐ तत्सदिति सूत्राचे जे सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥
हरिःॐ दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥धृपद॥
सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे । वेदाचे जे मूळ तुका म्हणे ॥२॥

अर्थ :
प्रथम हरी हे नाम म्हणजे वेदाचे बीज आहे आणि ओम तत सत या नामामध्ये संपूर्ण वेदाचा तात्पर्यभूत सार आहे व याचेही सार म्हणजे माझा कृपेचा सागर पाडूरंग आहे. ओम इत्यादी अक्षरे उदात्त, मध्य किंवा अनुदात्त स्वराने म्हटल्यावर जे हित होणारे आहे तेच हीत पाडूरंगाचा उच्चार केल्याने होणार आहे. तूकाराम महाराज म्हणतात, हा पाडूरंग सर्वत्र व्यापलेला असून सर्वांपासून निराळा आहे आणि तोच वेदाचे मूळ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग