मन करूनिया सावध । वा
3300.
मन करूनिया सावध । वाचे स्मरे तू गोविंद ॥१॥ तेणे साधे सर्व काज । सकळ साधनांचे निज ॥२॥ मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥ मन धांवे भलतीकडे । साधन वाया जाय कोडे ॥४॥ मन आवरुनी साधन । तेणे पावसी निजखुण ॥५॥ खूण संतांवांचुनी । एक जनार्दनी ध्यानी ॥६॥
