वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आवडे सकळा मिष्टान्न

🙏 3. संत तुकाराम · ABH-080869 · अभंग क्र. ३०९२

3092.
आवडे सकळा मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥
काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥धृपद॥
दर्पण नलगे एका । ठाव नाही ज्याच्या नाका ॥२॥
तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

अर्थ :
मिष्टान्न सर्वांना आवडते परंतू रोग्याला ते विषाच्या समानच वाटते. मग त्याच्या एकटयासाठी बाकीच्यांनी ते पदार्थ किंवा जे हव्या त्या वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न केला तर ते प्रयत्न खोटे ठरणार आहेत काय ? कामे व्यर्थ ठरतील काय ? आरशाची गरज कोणासाठी नाही, ज्याच्या नाकाचा ठावठिकाणाच नाही त्याच्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात चांगला उपदेश हा वाईट व्यक्तींना ऐकण्यासाठी कंटाळवाणे वाटते परंतू त्याच्या एकटयासाठी भल्या व्यक्तींना चांगला उपदेश करण्याचे सोडून देता येणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग