वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

भूमीवरी कोण ऐसा । गा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080602 · अभंग क्र. ३०९७

3097.
भूमीवरी कोण ऐसा । गांजू शके हरीच्या दासा ॥१॥
सुखे नाचा हो कीर्त्तनी । जयजयकारे गर्जा वाणी ॥धृपद॥
काळा सुटे पळ । जाती दुरिते सकळ ॥२॥
तुका म्हणे चित्ती । साच माना हे निश्चिंती ॥३॥

अर्थ :
या भूमीवर असा कोण आहे की, जो हरीच्या दासांना त्रास देऊ शकेल ? त्यामुळे कोणालाही घाबरु नका सुखाने हरी किर्तन करा हरीची गर्जना व जयजयकार वाणीने करत राहा. असे केल्याने काळ पळत सुटेल आणि तुमची सर्व पातके नाहीसी होतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही तुम्हाला सांगितले आहे ते अगदी खरे आहे व निश्चिंत आहे हे तुम्ही जाणा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग