वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कैसी करू आता सांग तु

🙏 3. संत तुकाराम · ABH-080818 · अभंग क्र. ३०६९

3069.
कैसी करू आता सांग तुझी सेवा । शब्दज्ञाने देवा नाश केला ॥१॥
आता तुझे वर्म न कळे अनंता । तुज न संगता बुडू पाहे ॥धृपद॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासी म्हणती एक ॥२॥
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचे पाळण स्थापुनिया ॥३॥
न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥
न जावे देउळा म्हणती देवघरी । बुडविली या परी तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
देवा या शब्दज्ञानी लोकांनी सर्व भक्तीचा नाश केला आहे तुझी सेवा आता मी कशी करु ते तू सांग ? हे अनंता आता तुझ्या प्राप्तीचे वर्म कोणते आहे हे मला काही कळेनासे झाले आहे तूच जर आता सांगितले नाहीस तर मी या भवसागरात बुडून जाईन. या शब्दज्ञानी लोकांनी तर संध्यास्नान इत्यादी शुध्द आचरणाचा नाशच केला आहे ते म्हणतात की, संध्यास्नानापाशी असे एवढे काय आहे ? अहो काही नास्तिक लोक तर म्हणतात की, देवळातला देव दगड आहे आणि पिंडाचे म्हणजे देहाचे पालन पोषण करावे हीच खरी भक्ती आहे असा नवीन धर्मच त्यांनी स्थापन करुन भक्तीच बुडवून टाकली आहे. अहो हे लोक म्हणतात की, हरीकथा करु नये एकादशी देखील धरु नये आणि भजनाचा तर यांनी पूर्णच नाशच करुन टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे हे नास्तिक लोक तर म्हणतात की देव देवळात नाही तर देव आपल्या ह्दयमंदीरात आपल्या घरीच आहे असे म्हणून यांनी भक्तीचा आणि सत्मार्गाचा नाश करुन भक्तीच बुडवली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग