वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

मायारूपे ऐसे मोहिलेस

🙏 3. संत तुकाराम · ABH-080680 · अभंग क्र. ३०६७

3067.
मायारूपे ऐसे मोहिलेसे जन । भोगिती पतन नानाकर्मे ॥१॥
काय याची प्रीती करिता आदर । दुराविता दूर तेचि भले ॥धृपद॥
नाना छंदे अंगी वसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥
तुका म्हणे ऐसे सिकवितो तुज । आता धरी लाज मना पुढे ॥३॥

अर्थ :
मायेने लोक मोहित झालेले असून ते विविध प्रकारचे पाप कर्म करतात व पतनाला जाऊन शेवटी नरक भोगतात. अशा लोकांविषयी प्रेम आणि आदर तुम्ही का करता अहो त्यांच्यापासून दूर झालेले व त्यांना दूर केलेलेच चांगले. अनेक प्रकारचे छंद आणि विकार असलेल्या माणसाजवळ आपण जर गेलो तर ते विकार आपल्याही अंगी जडतात आणि विविध प्रकारचे छंद आणि विकाराने तपोनिधी ऋषींना म्हणजे विश्वामित्रा सारख्या तपसव्यांना देखील खूप छळलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आज तुला एक गोष्ट शिकवतो ती तू ऐक आता पापी लोकांची संगती करण्याविषयी मनामध्ये तू लाज धर व त्यांच्यापासून दूर राहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग