माझे मन पाहे कसून ।
3096.
माझे मन पाहे कसून । चित्त न ढळे तुजपासून ॥१॥
कापुनि देइन शिर । पाहा कृपण की उदार ॥धृपद॥
मजवरी घाली घण । परि मी न सोडी चरण ॥२॥
तुका म्हणे अंती । तुजवाचूनि नाही गति ॥३॥
अर्थ :
देवा तू कसून माझ्या मनाची परीक्षा घ्यावी आणि पाहावे की माझे चित्त तुझ्यापासून अजिबात ढळत नाही. देवा तू जर म्हटलास तर मी माझे शीर देखील तुला कापून देईल मग मी कंजूष आहे की उदार आहे हे तूच पाहा. देवा माझ्यावर घनाचे घाव जरी घातले तरी मी तुझे चरण काही सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अंत:काळी आम्हाला तुझ्यावाचून दुसरी गतीच नाही.
