वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कान फाडूनिया मुद्रा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080752 · अभंग क्र. ३०७३

3073.
कान फाडूनिया मुद्रा ते घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥
पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरकलोका ॥३॥

अर्थ :
काही लोक कान फाडून त्यामध्ये लाकडाच्या किंवा कासवाच्या पृष्ठांचे कर्णभूषणे घालतात व स्वत:ला जगामध्ये नाथ म्हणवितात. अनेक गावामध्ये अनेक ठिकाणामध्ये जाऊन ते फेऱ्या घालतात आणि द्रव्य मागतात परंतू भगवान शंकराला ते ओळखतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे ढोंगी लोक स्वत:चे पोट भरण्याकरता काहीतरी उपाय शिकतात आणि शेवटी नरकाला जातात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग