वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

बाळ माते निष्ठुर होय

🙏 3. संत तुकाराम · ABH-080886 · अभंग क्र. ३१०४

3104.
बाळ माते निष्ठुर होय । परि ते स्नेह करीत आहे ॥१॥
तैसा तू गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हा ॥धृपद॥
नेणती भागली । कडे घेता अंग घाली ॥२॥
भूक साहे तहान । त्याचे राखे समाधान ॥३॥
त्याच्या दुःखे धाये । आपला जीव देऊ पाहे ॥४॥
नावे घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥

अर्थ :
मुलगा एखादयावेळी आईवर निष्ठूर होऊन रागावतो परंतू आई कधीही मुलावर निष्ठूर होत नाही ती सतत त्याच्यावर प्रेमच करीत राहते. त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा तू देखील तसाच आहे एक क्षणभर देखील तू आम्हाला विसरत नाही. नेणते लेकरु चालून चालून जर थकले तर त्याला कडेवर घेण्यासाठी आई आपले अंग पुढे करते व त्याला कडेवर घेते. स्वत:ला कितीही तहान लागो भूक लागो तरी देखील आई ते सहन करते परंतू मुलाला पोट भरुन त्याची तृप्ती होईपर्यंत जेवू घालून त्याचे समाधान करते. मुलाला झालेला त्रास पाहून ती माता माऊली रडू लागते आणि त्या मुलासाठी वेळप्रसंगी आपला जीव देण्यासाठी देखील ती मागेपुढे पाहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मुलाने आपल्या आईला नुसते आई या नावाने हाक जरी मारली तरी ती आई त्याच्यासाठी धावत येते अशा प्रकारे आई आपल्या मुलासाठी प्राण काढीत असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग