वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

सर्वस्वाची साटी । तर

🙏 3. संत तुकाराम · ABH-080704 · अभंग क्र. ३०९०

3090.
सर्वस्वाची साटी । तरिच देवासवे गाठी ॥१॥
नाही तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥धृपद॥
द्यावे तेचि घ्यावे । म्हणउनि ज्यावे जीवे ॥२॥
तुका म्हणे उरी । मागे नूरविता बरी ॥३॥

अर्थ :
सर्वस्वाचा त्याग केला तरच देवाबरोबर गाठ होते. नाहीतर ज्याला ज्या गोष्टीची इच्छा असेल त्या गोष्टीचा भोग त्याला भोगावा लागेल. जसे दयावे तसे घ्यावे या नियमाने तुम्ही निष्काम भक्ती केली तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल सकाम भक्ती केली तर तुम्हाला भोग प्राप्त होईल त्यामुळे निष्काम भक्ती करुन जीव देवाला समर्पण करुन त्याला शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा की तुम्ही देवाला सर्वस्व अर्पण केले आहेस तर मग मागे माझे काही बाकी आहे असे न म्हणलेलेच चांगले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग