फजितखोरांचे जीवी । ल
3078.
फजितखोरांचे जीवी । लाज नाही सर्वथा ॥१॥
सांगता ते न धरती मनी । नायकती कानी शिकविले ॥२॥
म्हैसा जैसा उन्मत्त मदें । काम छंदे तेवीं नाचे ॥३॥
एका जनार्दनी ते पामर । जन्म वेरझार भोगिती ॥४॥