तुझा म्हणवूनी दिसतो
3081.
तुझा म्हणवूनी दिसतो गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥
अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणी कोण पावे ॥धृ॥
तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवु मज ॥२॥
तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
देवा मी स्वत:ला तुझा दास म्हणून घेतो तुझा म्हणून घेतो तरी देखील असा दीन केविलवाणे दिसतो आहे तरी देखील तुला काहीच का वाटत नाही याचा अर्थ असा की तुला आमच्याविषयीचा मानसच सरलेला दिसत आहे. अज्ञानी बालकावर जर त्याची आई चिडली तर निर्वाणीच्या वेळी त्याच्याकडे कोण धावत जाईन ? हे विठोबा मी तुझ्यावाचून एकला परदेशी झालो आहे मला या दु:खामध्ये गोवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा पाडूरंगा मला तर सर्व तुझीच आशा आहे तुझ्याच आशेवर मी राहात आहे.
