वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

या रे नाचो अवघेजण ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080711 · अभंग क्र. ३०९४

3094.
या रे नाचो अवघेजण । भावे आनंदे करून ॥१॥
गाऊ पंढरीचा राणा । क्षेम देऊन संतजना ॥धृपद॥
सुख फुका साठी । साधे हरीनाम बोभाटी ॥२॥
प्रेम वाटीतो उदार । देता नाही सान थोर ॥३॥
पापे पळाली बापुडी । काळ झाला देशधडी ॥४॥
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥

अर्थ :
हे भक्तांनो सारेजण या आपण मिळून हरीनामाच्या भक्तीभावामध्ये आनंद करुन नाचू. पंढरीच्या रायाचे आपण गुणगान गाऊ आणि संतजणांना क्षेम आलिंगन देऊ. सुखाची प्राप्ती जर फुकट करुन घ्यायची असेल तर केवळ हरीनामाचा गजर करा. तो उदार परमात्मा सर्वांना सारख्या प्रमाणातच त्याचे प्रेम वाटतो लहान मोठा याचा विचार तो कधीही करत नाही. हरीनामाचा गजर भक्तीभावाने केल्यामुळे बिचारी पापे तर पळूनच गेली पण कळीकाळ तर देशोधडीलाच गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आजचा काळ धन्य आहे कारण आज हरीप्रेमाचा सुकाळ झाला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग