साकरेची गोडी साकर सा
3070.
साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसे आयुष्य जोडिले जोडी नरदेहा ॥१॥
मातियाचें आवदाणें घालिताती अंगी । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥
गेले गेले बापा हित हातोहाती । पुढे आली राती काळवंखी ॥३॥
आयुष्याच्या शेवटी सुखाचिया गोष्टी । काळा नळा पोटी पडसील बापा ॥४॥
सोलवी सुकृत भरूनियां मापा । विषयासाठीं पाहे पा लावितोसी ॥५॥
अमृत जोडोनि सायासी गळी का लावितोसी । घालूनि मत्स्यासी कवण काज ॥६॥
मिनली चिंतामणीची शिळा घोटिव चौबळा । का रे नेउनी पायातळा रचितोसी ॥७॥
तेथे जे जे कांही चिंतिसी ते अधिकची पावसी । नरकासी चौपासी वाढविली ॥८॥
कल्पतरू देखोनि डोळा उभा राहुनी तया तळां । म्हणसी मर मर निर्फळा काय करू ॥९॥
तेथे मर मर उच्चारिले मरण अधिक जाले । तुझिया कल्पना केले वैर तुज ॥१०॥
येवोनि ये जनी जन्म उत्तम योगी । का रे भजन नारायणीं चुकलासीं ॥११॥
जंववरी आयुष्य आहे तंववरी हिताची सोये । एका जनार्दनी शरण जाये एकपणे ॥१२॥
