वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पतिव्रता ऐसी जगामध्य

🙏 3. संत तुकाराम · ABH-080801 · अभंग क्र. ३०६३

3063.
पतिव्रता ऐसी जगामध्ये मात । भोगी पाच सात अंधारी ते ॥१॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषी मन संभ्रम तो ॥२॥
तुका म्हणे तिच्या दोषा नाही पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥

अर्थ :
एखादया स्त्रीची जगामध्ये पतीव्रता म्हणून ख्याती असते परंतू ती अंधारामध्ये पाच सात जणांचा भोग घेते. स्वत:च्या नवऱ्याला ती कुत्र्यासमान समजते आणि परपुरुषाच्या ठिकाणी तिचे मन गुंतलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्त्रीच्या दोषाला अंत:पारच नाही ती अघोर असा कुंभीपाक नरक भोगेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग