वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

जेजे काही मज होईल वा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080516 · अभंग क्र. ३०६८

3068.
जेजे काही मज होईल वासना । तेते नारायणा व्हावे तुम्ही ॥१॥
काय भाव एक निवडू निराळा । जाणसी तू कळा अंतरीचे ॥धृपद॥
तुजविण मज कोण आहे सखा । जे सांगा आणिका जीवभाव ॥२॥
अवघे पिशुन झाले असे जन । आपपर कोण नाठवे हे ॥३॥
तुका म्हणे तूचि जीवांचे जीवन । माझे समाधान तुझे हाती ॥४॥

अर्थ :
हे नारायण मला ज्या काही वासना इच्छा आवड निर्माण होतील त्या तुम्हीच व्हाव्या. अहो देवा माझ्या मनातील कोणता एक भाव मी वेगळा म्हणून निवडू, तुम्ही तर माझ्या अंत:करणातील सर्व भाव जाणता आहातच. देवा अहो तुमच्यावाचून माझा दुसरा कोण सखा आहे की ज्याला मी माझ्या अंत:करणातील जीव भाव सांगू ? देवा सर्व लोक मला दुष्टपणा सारखेच वाटत आहेत या ठिकाणी आपले कोण आणि परके कोण हे मला काहीच आठवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तूच एक माझ्या जीवाचे जीवन आहेस आणि माझे समाधान देखील तुझ्या हातात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग