वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आम्हा केले गुणवंत ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080890 · अभंग क्र. ३१०९

3109.
आम्हा केले गुणवंत । ते उचित राखावे ॥१॥
तुम्हासी तो चाड नाही । आणिका काही सुखदुःखा ॥धृपद॥
दासांचे तो देखो नये । उणे काय होईल ते ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही आम्हाला त्रिगुणात बांधून टाकले आहे मग त्यापासून उचित प्रकारे आमचे रक्षण करा. देवा इतरांना सुख होवो अथवा दु:ख होवो तुम्हाला त्याची काही काळजीच नाही. आपल्या भक्तांना आपल्या दासांना काही उणे पडते की काय आणि पडत असेल तर ते आपण लगेच भरुन काढावे असे तुम्हाला वाटले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरा तुमची कृपादृष्टी आमच्यासमोर करा व आम्हाला तुम्ही समाधानी करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग