वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तन मन धन दिले पंढरिर

🙏 3. संत तुकाराम · ABH-080795 · अभंग क्र. ३०८५

3085.
तन मन धन दिले पंढरिराया । आता सांगावया उरले नाही ॥१॥
आर्त चाड चिंता नाही मनी आशा । तोडियेला फासा उपाधीचा ॥२॥
तुका म्हणे एक विठोबाचे नाम । आहे जवळी दाम नाही रुका ॥३॥

अर्थ :
मी माझे तन मन आणि धन पंढरीरायाला दिले आहे आता सांगण्यासाठी काहीच उरले नाही. आता कोणत्याही गोष्टीविषयी इच्छा आवड कशाचीही चिंता आणि मनात कोणत्याही गोष्टीविषयी आशा राहिलेली नाही सर्व उपाधीचा भासच मी तोडून टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्याजवळ केवळ एक विठोबाचे नाम आहे बाकी माझ्याजवळ कोणतेही दमडी किंवा एखादा रुका (रुपया) म्हणजे पैसे सुध्दा नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग