वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

धन मानबळे नाठविसी दे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085322 · अभंग क्र. ३०८४

3084.
धन मानबळे नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे ते दंद बैसतील माथा । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥
माता पिता बंधु सोइरे धाईरे । जोंवरी इंद्रियें चालताती ॥३॥
सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता । ती ही केश देता रडुं लागे ॥४॥
एका जनार्दनी जातांचि शरण । स्वप्नीं जन्ममरण नाही नाही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग