वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आता माझ्या दुःखा कोण

🙏 3. संत तुकाराम · ABH-080814 · अभंग क्र. ३०८२

3082.
आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावेचि ना ॥१॥
कायविधा त्याने घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होयचि ॥२॥
तुका म्हणे माझी विसरू नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥

अर्थ :
आता माझ्या या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सोबती कोण असणार आहे मी ज्या पाडूरंगाचा धावा केला तोच रुक्मिणीचा पती मला पावत नाही. या विधात्याने माझ्या नशिबात काय घातले आहे काय माहित या दु:खातून माझी सुटकाच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरीनाथा माझी चिंता तुम्हालाच करायची आहे हे तुम्ही विसरु नका आणि मला लवकर तुम्ही भेट दयावी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग