वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अगत्य ज्या नरका जाणे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080778 · अभंग क्र. ३११०

3110.
अगत्य ज्या नरका जाणे । वीट मानणे कीर्तने ॥१॥
नावडेसा झाला बाप । आले पाप वस्तीसि ॥धृपद॥
नारायण नाही वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥
तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥३॥

अर्थ :
ज्याला नरकाला अवश्य जावे असे वाटत असेल त्याने किर्तनाचा वीट मानावा. सर्वच जगाचा चालक जो देव आहे तो आपला बाप आहे आणि आपला बाप म्हणजे पिता ज्याला आवडेनासा झाला आहे मग त्याच्या जवळ सर्व पापे येऊन वास्तव्य करतात हेच जाणून घ्यावे. अहो ज्याच्या मुखाला नारायणाचे नामच येत नाही ते यमाला दिलेले आंदणच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे अभक्त आहेत त्यांची आई म्हणजेच सर्व जगाची बटिकच आहे असे समजावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग